केंद्र व राज्य सरकारच्या जागेत अदलाबदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

भुसावळ बसस्थानकाची जागा बदलणार?


 
भुसावळ :
भुसावळ बस स्थानकाची सध्याची जागा बदलून बसस्थानक केंद्र सरकारच्या अर्ध्या रेल्वे प्रशासनाच्या जागेत स्थलांतरीत होण्याची शक्यता असून याबाबत सकारात्मक कारवाई मंत्रालय स्तरावर होत आहे.
 
 
भुसावळ बसस्थानक हे रेल्वे स्थानकाच्या शेजारीच आहे. प्रवाशांच्या सोयीचे हे स्थानक आहे. परंतु बस स्थानक चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. बसस्थानक येथून स्थलांतरीत होत आहे अशी चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे.परंतु प्रत्यक्षात कारवाई सुरू झाल्याचे जाणवत नव्हते. बसस्थानकाची जागा ही रेल्वे प्रशासनाची होती. राज्य सरकारने ही जागा केंद्र प्रशासनाकडून विकत घेतली होती. अनेक वर्षापर्यंत बस स्थानक सुरळीत सुरू होते. परंतु मागील दोन वर्षांपुर्वी रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील रेल्वेच्या जागेला बॅरिकेटस टाकले यामुळे बसस्थानकात येणार्‍या बसेसला मोठी अडचण निर्माण झाली होती. एस.टी.महामंडळ व स्थानिक प्रशासनाने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधल्याने थोडी मोकळीक बस स्थानकास देण्यात आली.
 
 
परंतु वाहतुकीची कोंडी सुटत नव्हती. तशातच रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होत आहे. यात लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सुध्दा स्थलांतरण होत आहे. बसस्थानकाची जागा रेल्वेला हवी आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे याबाबत सकारात्मक पाठपुरावा सुरू आहे. बस स्थानकाची जागा रेल्वे प्रशासनाला दिल्यास विद्यमान बसस्थानका समोेरील रेल्वेची जागा बस स्थानकास देण्यात येणार आहे. अर्थात जेवढी जागा बस स्थानकाची आहे तेवढीच जागा रेल्वे प्रशासन बस स्थानकास देणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या जागेची ही अदलाबदल होणार आहे. जर राज्य सरकारने यास मंजुरी दिली तर दोघांची सोय होणार आहे. आणि वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@