पाचोरा तालुक्यातील ७ साठवण बंधार्‍यांसाठी दोन कोटी रुपये मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

पाचोरा तालुक्यातील ७ साठवण बंधार्‍यांसाठी दोन कोटी रुपये मंजूर


 
 
पाचोरा :
सततच्या अल्पपावसाळ्यामुळे पाचोरा तालुक्यामध्ये घटती जलपातळी आणि पाणी टंचाई ह्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे तथा विजय शिवतारे यांचेकडे साठवण बंधार्‍यांचे प्रस्ताव दाखल करून सतत पाठपुरावा केला. त्यांच्या दालनात बैठका घेऊन चर्चेमध्ये पाण्यामुळे निर्माण झालेल्या बिकट समस्या लक्षात आणून दिल्या. मंत्र्यांनी गंभीर समस्येची दखल घेऊन २ कोटी रुपये निधी ७ साठवण बंधार्‍यासाठी मंजूर केलेला असून, प्रशासकीय मान्यता देखील झालेली आहे.लवकरच कामाची निविदा निघून कामास सुरुवात केली जाणार आहे. आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांनी जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत नदी पुनरूज्जीवनर्जीवर, वन कार्यक्रम अंतर्गत पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक (हिवरा नदी) ३३ लक्ष, खडकदेवळा (हिवरा नदी) ३३ लक्ष, खाजोळा (गडद नदी) ५७ लक्ष, नेरी-२ (गडद नदी) ३६ लक्ष, लासगाव (कुरकुर नाला) १७ लक्ष, कुरंगी (स्थानिक नाला) १७ लक्ष, गाळण (स्थानिक नाला) ११ लक्ष, याप्रमाणे ७ साठवण बंधारे मंजूर झालेले आहेत.
 
 
यामुळे शेतीला सिंचानासाठी पाणी उपलब्ध होईल. पर्यायाने शेतीचे उत्पन्न वाढेल. पशुधनासाठी चारा व पिण्याचे पाणीही मिळेल. भूगर्भातील जलसाठा वाढून विहिरीतील पाण्याची पातळी देखील वाढेल. या गावांमधील आणि परिसरातील शेतकरी वर्ग समाधानी झाले असून त्यांनी आमदार किशोर पाटील यांचे अभिनंदन केले असून आभार देखील व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@