मर्यादा तुम्ही तोडल्या, शेवट मी करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2018
Total Views |



धनंजय मुंडे यांचे सरकारवर टिकास्त्र

मुंबई : विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी एक आॉडिओ क्लिप बुधवारी एका वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गुरूवारी हा मुद्दा अतिशय गाजला. वृत्तादरम्यान विधिमंडळात दलाली सुरू आहे असे वक्तव्य करण्यात आले. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. सभागृहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. आर्थिक देवाणघेवाणीसारखे आरोप करून वैयक्तिक पातळीवर आरोप करण्याच्या मर्यादा तुम्ही ओलांडल्या, मात्र आता याचा शेवट मी करणार असे सांगत मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले.


होळीच्या निमित्ताने आज आपली अग्निपरीक्षा होत आहे. मात्र आपण अशा हजार अग्निपरीक्षा देण्यास तयार असल्याचे म्हणत मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले. आपण जे काही करतो ते इमानदारीने करतो. कोणाचीही बदनामी करत नाही. तरीदेखील असे राजकारण होत असेल तर यादेशात लोकशाही आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येक मुद्दा आपण ठामपणे मांडला असून सरकारला कोंडीत पकडल्याने हा राग मनात धरून सदर आरोप करण्यात आल्याचे ते म्हणाले.


हवी तर नार्को टेस्ट करा
कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. आपली सर्वात जास्त चिड करणाऱ्या व्यक्तीकडून आपली चौकशी करावी किंवा स्वत: आपण नार्को टेस्ट करा, असे मुंडे यावेळी म्हणाले. तसेच धनंजय गावडे, प्रमोद दळवी, न्यूज १८ लोकमत या वाहिनीच्या संपादकाचींही नार्को टेस्ट झाली पाहिजे. दळवी ही व्यक्ती कोणाकोणाला भेटली, कोणाच्या केबीनमध्ये गेली याचीही चौकशी करावी असे मुंडे म्हणाले.

 
वृत्तवाहिनीवर हक्कभंग प्रस्ताव
न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे, असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारे असल्याचे सांगत न्यूज १८ लोकमत वाहिनीचे मालक, संपादक, वार्ताहर, वृत्तनिवेदक आणि एचडीआयएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरोधात आ. हेमंत टकले यांनी हक्कभंगप्रस्ताव दाखल केला. दरम्यान हक्कभंग समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी होणार असून अधिवेशन संपण्यापूर्वी या समितीने अहवाल सादर करावा असे, निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत.


@@AUTHORINFO_V1@@