छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे कंत्राट ‘एल अॅण्ड टी’कडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2018
Total Views |

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती


 
 
 
मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीचे कंत्राट लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपनीला देण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे विधानपरिषदेत ही माहिती दिली.
 
या प्रकल्पाच्या कंत्राटासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी लार्सन अॅण्ड टूब्रो कंपनीची निविदा अंतिम प्रक्रियेत पात्र ठरली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि लार्सन अॅण्ड टूब्रो कंपनीशी सविस्तर चर्चा केली आहे. तसेच कायदेतज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन अडीच हजार कोटी रुपये अधिक वस्तू आणि सेवा कर असा प्रस्ताव मंजूर केला असल्याचे पाटील म्हणाले.
 
 
 
 
तीन वर्षात स्मारक पूर्ण होणार : 
 
हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरण तसेच सागरी विषयक अभ्यास अहवाल नामांकित संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक विविध विभागांचे एकूण १२ ना हरकत दाखले देखील मिळाले असल्याचे पाटील म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@