जे. जे. रुग्णालयात टीबीवरील अत्याधुनिक संशोधन केंद्र उभारणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2018
Total Views |

आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, मुंबईत २ प्रयोगशाळांचीही निर्मिती

 

 
 
 
मुंबई : क्षयरोग अर्थात टीबी या आजारावरील अधिकचे संशोधन करण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असून क्षयरोग तपासणीसाठी मुंबईत तीन प्रयोगशाळा सुरू असून आणखी दोन प्रयोगशाळाही सुरू करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली.
 
भाजप आमदार पराग आळवणी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना डॉ. दीपक सावंत बोलत होते. पराग आळवणी यांनी मुंबई शहरात क्षयरोगाचे वाढते प्रमाण, त्यांची विविध कारणे आणि त्यावरील उपचारांची सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आदी मुद्दे मांडले होते.
 
यावर उत्तर देताना सावंत म्हणाले की, राज्यात एकूण नोंदविलेल्या क्षयरुग्णांपैकी साधारणात: १८ ते २० टक्के रुग्ण मुंबईत आढळून येतात. क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी मुंबई शहरात स्वतंत्र २४ जिल्हा क्षयरोग केंद्र आहेत. राज्यात ५१७ क्षयरोग उपचार पथके असून मुंबईत ५९ पथक कार्यरत आहेत. नियमित औषधोपचारास जे रुग्ण दाद देत नाहीत अशा एमडीआर, एक्सडीआरबाधीत रुग्णांची प्रयोगशाळा तपासणीसाठी राज्यात १२ कल्चर ॲण्ड डीएसटी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी मुंबईत पाच ठिकाणी या प्रयोगशाळा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जे. जे. रुग्णालय, हिंदुजा हॉस्पीटल, जीटीबी हॉस्पीटल, मेट्रोपॉलीस हेल्थकेअर लॅबोरेटरी व एसआरएल येथे प्रयोगशाळा मंजूर झाल्या आहेत त्यातील जे.जे. आणि हिंदुजा येथील प्रयोगशाळा कार्यरत असून सहा महिन्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरू होतील, असे डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली असून त्यासाठी चौसूत्री पद्धतीने कार्यक्रम राबवला जात आहे. मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये क्षयरुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रदुषणामुळे होणाऱ्या क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष नेमून त्याद्वारे तपासणी करण्यात येईल, असे डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले. सदर चर्चेत माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे, अजित पवार, तसेच आमदार अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, अबु आझमी यांसह अनेकांनी सहभाग घेतला.
 
@@AUTHORINFO_V1@@