बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी टाळाटाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2018
Total Views |

मजुरांना लाभ देण्यास बँका अनुत्सुक
मजूर आर्थिक अडचणीत
 

 

नाशिक : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी’ योजनेत कार्यरत असलेल्या मजुरांचा आधार क्रमांक पडताळणी करून तो बँक खात्याशी जोडण्यास बँकांनी उदासीनता दाखविल्याने आधारबेस पेमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यात अडचणी येत आहेत. बँकांनी या कामासाठी उत्सुकता न दाखविल्यास विविध योजनांचा जमा असलेला निधी अन्य बँकांमध्ये वळता करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे.
जिल्ह्यात एकूण २ लाख, ४० हजार ६९ मजूर कार्यरत असून, दोन लाख, १७ हजार ३०३ मजुरांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यासंदर्भातील प्रपत्र तालुकास्तरावरील बँकांकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, बँकांनी आतापर्यंत केवळ ७१ हजार ४६३ एवढ्याच मजुरांची आधार क्रमांकांची पडताळणी करून ते बँक खात्याला जोडले आहेत.
परिणामी मजुरांना आधारबेस पेमेंट प्रणालीद्वारे मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत आहे तर दुसरीकडे सरकारने मात्र मजुरांना मंजुरी वेळेत मिळावी, या हेतूने आधारबेस पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बँक समन्वय समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. नरेश गिते यांनी दिली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@