आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी शाळातील प्रवेश प्रक्रिया सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी शाळातील प्रवेश प्रक्रिया सुरू 
 
 
नाशिक:  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली असून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी पहिली व दुसरी इयत्तेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवेश घेता येईल. यासाठी विहीत पद्धतीने भरलेले अर्ज कागदपत्रांसह २० मार्च २०१८ पर्यंत प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास विभाग, नाशिक येथे सादर करावे लागतील.
 
 
आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या कार्यक्षेत्रातील पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला व नाशिक तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सक्षम अधिकार्‍याने दिलेला अनुसूचित जमातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, जन्मदाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र यासह अर्ज करायचे आहेत. इयत्ता पहिलीसाठी ३० सप्टेंबर २०१८ रोजी वय ५ वर्षे ८ महिने पूर्ण व जन्म १ जानेवारी २०१२ ते ३० जानेवारी २०१३ या दरम्यान झालेला असावा. दुसरीसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनी २०१७-१८ मध्ये शाळेत प्रवेशित असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडावे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये असावे.
 
 
 
कागदपत्रे तपासणीसाठी पेठ, इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यातील पालकांनी २८ एप्रिल रोजी व दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला तालुक्यातील पालकांनी २९ एप्रिल रोजी एकलव्य पब्लिक स्कूल, पेठ रोड, आरटीओ कार्यालयाजवळ, नाशिक येथे सकाळी १० वाजता कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक संख्येने अर्ज आल्यास विद्यार्थी निवड लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी, नाशिक यांनी कळविले आहे.  
 
@@AUTHORINFO_V1@@