नगरविकास प्रधान सचिव मनिषा म्हैसकरांनी केला नवी मुंबईचा पाहणी दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नवी मुंबई : ’स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ च्या अनुषंगाने नवी मुंबई शहर सज्ज होत असताना महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग प्रधान सचिव मनिषा पाटणकर - म्हैसकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास भेट देऊन स्वच्छताविषयक बाबींची तसेच प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसचिव सुधाकर बोबडे उपस्थित होते.
 
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे, याबद्दल समाधान व्यक्त करत नवी मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्रातही कचरा वर्गीकरण चांगल्या प्रकारे होत असल्याबद्दल मनिषा म्हैसकर यांनी इतर शहरांनी याचे अनुकरण करावे, असे मत व्यक्त केले.
 
या पाहणी दौर्‍यात वंडर्स पार्क, यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील फुटबॉल ग्राऊंड, वाशी रेल्वेस्थानक परिसर, वाशी बस डेपो, निसर्गोद्यान कोपरखैरणे या ठिकाणी भेटी देऊन प्रधान सचिव म्हैसकर यांनी तेथील स्वच्छतेची व अनुषांगिक बाबींची पाहणी केली. सानपाडा येथील मिलेनियम टॉवर सोसायटीला भेट देऊन त्यांनी त्या ठिकाणी कार्यान्वित ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती यंत्रणा व कंपोस्ट पिट्सची पाहणी केली. सोसायटीतील महिला जागरूकतेने कचरा वर्गीकरणावर भर देत असल्याबद्दल आणि सोसायटीमध्ये प्लास्टिक वापरावर व थुंकण्यावर निर्बंध लावण्याबाबत लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकाची त्यांनी प्रशंसा केली.
 
नवी मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात देशात आठवा आलेला नंबर यावर्षी पहिला आणण्यासाठी जय्यत तयारी केली असून स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षण समिती नवी मुंबई क्षेत्राला भेट देण्यापूर्वी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हैसकर यांनी स्वच्छताविषयक पाहणी करून नवी मुंबई महानगरपालिकेला सर्वेक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@