ब्राह्मणांनी एकत्र येत संघटित व्हावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |

डोंबिवलीत ब्राह्मण ज्ञातींचे एकत्रिकरण

 

 
डोंबिवली : ब्राह्मणांनीही एकत्र येण्याची नितांत गरज असून त्यासाठी डोंबिवलीसह परिसरातील ब्राह्मणांनी एकत्र यावे, संघटित व्हावे,” असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले.
 
”जातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणूक देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणावरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. असे डोंबिवलीत संपन्न झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
 
डोंबिवली ब्राह्मण सभेमध्ये मंगळवारी रात्री घेण्यात आलेल्या सभेमध्ये संघटनात्मक कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रज्ञेश प्रभुघाटे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली तर संदीप पुराणिक हे महासंघाचे कार्यवाह म्हणून काम बघतील. मानस पिंगळे, प्रदीप जोशी हे उपाध्यक्ष, निलेश विरकर सहकार्यवाह, विवेक परांजपे कोषपाल, मनिषा धोपटकर सहकोषपाल तर डॉ. अरुण नाटेकर, माधव घुले, प्रशांत जोशी, नारायण रत्नपारखी, हेमंत पाठक, मुकुंद कुलकर्णी, डॉ. विनय भोळे हे सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले.
 
तसेच वासुदेव रायकर, अनघा बोंद्रे, उन्मेश शेवडे, अनुजा कुलकर्णी, अनिकेत घमंडी, वैशाली कोरडे, प्रदीप म्हसकर, प्रसाद शुक्ल, अभिजित कानेटकर हे सदस्यपदी नियुक्त करण्यात आले.
 
नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत महिला समिती, शिक्षण समिती, सांस्कृतिक समिती, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समिती, युवा समिती अशा समिती नेमण्यात आल्या असून आगामी बैठकीत त्या समितीमध्ये कार्यरत असणार्‍या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे प्रभुघाटे यांनी सांगितले, पण ब्राह्मणांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून संघटितपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्ञातींसह महासंघाचे सभासद व्हा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@