२६ वा वार्षिक ब्रह्मोत्सव कार्यक्रम ‘नारी शक्ती’ ला समर्पित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |
 
 
 

 
 
बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ संदेश देत ब्रह्मोत्सव संपन्न
 

नाशिक: श्री भक्तवत्सल बालाजी मंदिराचा वार्षिक ब्रह्मोेत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ’बेटी बचाव, बेटी पढ़ाओ’ व नारीशक्तीचा गजर देण्याच्या विविध कार्यक्रमांमुळे या महोत्सवाला वेगळीच शोभा आली होती. ’’’बेटी बचाव, बेटी पढ़ाओ’ व ’नारीशक्ती’ या विषयावर नाटिका, नृत्यनाटिका अशा विविध कार्यक्रमांमुळे या भक्तिमय कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाल्याचे’’ श्री झालरीया पिठाधीपती १००८ श्री स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज व वेदांत मर्मज्ञ संत शिरोमणी पूज्य युवराज श्री भूदेवाचार्यजी महाराज यांनी सांगितले.
 
 
लासलगाव येथे बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने वार्षिक ब्रह्मोत्सव समारंभानिमित्त सकाळी नवकलश अभिषेक करण्यात आले. दुपारी गावातून  सुवर्ण-चांदीच्या अलंकाराने आभूषित श्री बालाजी, श्री श्रीदेवी, श्रीभूदेवी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
 
 
शोभायात्रेनंतर शिवाजी चौकामध्ये मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत, मुलगा मुलगी असा भेदाभेद करू नका,असा मोलाचा संदेश या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लासलगावकरांना मिळाला. विशेष म्हणजे या संपूर्ण शोभायात्रेमध्ये महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे दिसून येत होते. यावेळी श्री महावीर जैन विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालय लेझीम पथकही यात सहभागी झालेले तर कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. यावेळी ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@