दक्षिण आफ्रिकेवर सलग तिसरा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |

एकदिवसीय मालिकेत भारताची दमदार आघाडी

तिसरा सामना १२४ धावांनी खिशात




केप टाऊन :
भारत आणि द.आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या सहा सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेतील तिसरा सामना देखील भारताने १२४ धावांनी जिंकला असून या मालिकेमध्ये भारताने आफ्रिकेविरोधात ३-० अशी आघाडीघेतली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद दीड शतकी खेळीच्या बळावर भारताने अफिकेला दिलेले ३०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, आफ्रिका संघ १७९ धावांवरच कोलमडून पडला. कालच्या सामन्यात आपल्या दमदार खेळीचे प्रदर्शन करणारा विराट कोहली हा कालच्या सामन्याच्या सामनावीर ठरला.

केप टाऊन येथील न्यूलँड मैदानवर झालेल्या या सामन्यात आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात पहिला मोठा धक्का बसला, संघाचा उपकर्णधार आणि स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा हा शून्यावरच बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने शिखर धवनच्या साथीने दुसऱ्या बळीसाठी तब्बल १४० धावांची भागीदारी रचली. धवनने देखील आपल्या नेहमीच्या स्फोटक खेळीचे प्रदर्शन करत १२ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. तर कर्णधार कोहलीने देखील आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन नाबाद १६० धावांची दमदार खेळी करून आफ्रिकेसमोर ३०३ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये भारताकडून अजिंक्य राहणे (११), हार्दिक पंड्या (१४), एमएस धोनी (१०) आणि केदार जाधव (१) यांनी आपल्या परीने धावा केल्या.


यानंतर मैदानात आलेल्या आफ्रिका संघाला देखील सुरुवातीलाच पहिला धक्का देत भारताने हाशीम अमला (१) या मोठ्या खेळाडूला तंबूत परत धाडले. यानंतर अॅडेन मार्क्रम (३२), जेन पॉल (५१), डेविड मायलर (२५). काया झोन्डो (१७) या सर्वच मातब्बर खेळाडूंना देखील भारतीय गोलंदाजांनी परतीचा रस्ता दाखवला. भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे अवघ्या ४० षटकांमध्येच आफ्रिकेचा डाव १७९ धावांवरच संपुष्टात आला. याबदल्यात भारताकडून यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी ४-४ बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह याने एकट्याने २ बळी घेतले.

धोनी ठरला ४०० विकेट घेणारा पहिला विकेट कीपर
 
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी कालच्या सामन्यामध्ये एक नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.  आफ्रिका संघाचा कर्णधार अॅडेन मार्क्रम याला कालच्या सामन्यात यष्टीचीत करून ४०० बळी घेणारा धोनी हा जगातील एकमेव यष्टीरक्षक ठरला आहे.  

 
 
@@AUTHORINFO_V1@@