‘मोठेपणाचा मार्ग हा मृत्यूच्या मैदानातून जातो’ - विष्णू सवरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
३ आदिवासी वसतिगृहाचे लोकार्पण
५० हजार आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळेत
 

वर्धा: आयुष्यात खूप पैसा, प्रतिष्ठा आणि नाव कमवायचे असेल तर आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती असावी लागते. सुख मिळवण्यासाठी कष्ट करण्याची आणि शिकण्याची जिद्द ठेवा हा संदेश विद्यार्थ्याना देताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी 'मोठेपणाचा मार्ग हा मृत्यूच्या मैदानातून जातो' असे प्रतिपादन केले.
 
 
उमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतिगृह आणि मुलींचे शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सवरा उदघाटक म्हणून बोलत होते. आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शासनामार्फत आदिवासी विद्यार्थ्याना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ आज ५० हजार विद्यार्थी घेत आहेत.
 
 
आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा मिळाव्यात आणि चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून सर्व आदिवासी शाळा आणि वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मागील दोन वर्षात राज्यात २०६ इमारतीचे काम सुरू केले असून त्यापैकी ८१ इमारती पूर्ण झाल्या आहेत. आदिवासी जनतेचा विकास हेच ध्येय ठेऊन शासन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, आणि लवकरच या जिल्ह्यातही असे भवन उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार पंकज भोयर यांच्या मागणीवरून त्यांनी सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाला कर्मचारी वर्ग देण्याची मागणी मान्य केली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@