अयोध्या प्रकरणी अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |


नवी दिल्ली : गेल्या २५ वर्षांपासून विवादात अडकलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी अंतिम सुनावणी आजपासून सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयाचे विशेष खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करणार आहे. दरम्यान प्रकरणी आलेल्या अनेक याचिकांवर देखील या दरम्यान सुनावणी करण्यात येणार संपूर्ण देशाचे लक्ष सध्या या सुनावणीकडे लागले आहे.

आज दुपारी २ वाजल्यापासून या प्रकरणीच्या अंतिम सुनावणीला प्रारंभ होणार आहे. तसेच या वर्षीच्या शेवटपर्यंत या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच प्रकरणी न्यायालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर देखील सुनावणी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये न्यायालयाने अयोध्या प्रकरणी अंतिम सुनावणीला फेब्रुवारीमध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे कागदपत्रे आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात यावीत, असे निर्देश दोन्ही पक्षांना न्यायालयाने दिले होते. परंतु मुस्लीम पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही सुनावणी २०१९ पर्यंत राखून ठेवण्याची मागणी न्यायालयकडे केली होती. कारण या सुनावणीचा परिणाम देशाच्या निवडणुकांवर होऊ शकतो, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता. परंतु न्यायालयाने सिब्बल यांची ही मागणी धुडकावून लावत, सुनावणी फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@