अत्याधुनिक पंचवटी एक्सप्रेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |

नवीन डब्यांचे काम अंतिम टप्प्यांत


 
 
 
 
नाशिक : आरामदायी बैठक व्यवस्था, आसनालगत भ्रमणध्वनी चार्जिंगची सुविधा, बोगींना दिलेला नावीन्यपूर्ण रंग, बोगीच्या दोन्ही बाजूला कचरापेटीची व्यवस्था, अशा एक ना अनेक सोयी-सुविधांचा अंतर्भाव असलेली पंचवटी एक्स्प्रेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
 
बोगींची बांधणी पूर्णत्वाकडे असून महिन्याभरात ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वे परिषदेने केलेल्या सूचना रेल्वेने स्वीकारल्या आहेत. या निमित्ताने पंचवटी एक्सप्रेसचा चेहरामोहरा बदलणार असल्याने नाशिककरांचा मुंबई प्रवास सुखकर होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रमुख भिस्त असणारी रेल्वेगाडी म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची ओळख आहे. नोकरी, व्यापार, तत्सम कारणास्तव मुंबईला हजारो नागरिक या गाडीने प्रवास करतात. नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आदींसाठी ही सोयीची गाडी आहे. रेल्वेला या गाडीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते.
 
 
रेल परिषदेने आदर्श कोचच्या माध्यमातून पंचवटी एक्स्प्रेसला पाच वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून दिले आहे. आता संपूर्ण पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श रेल्वेगाडी बनविण्याचा रेल परिषदेचा प्रयत्न आहे. त्या अंतर्गत प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, प्रवास सुखकर व्हावा, याकरिता रेल परिषदेने या गाडीला सर्व २१ डबे नवीन मिळावे, याकरिता पाठपुरावा सुरू केला होता. त्यास रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चेन्नई येथील रेल्वेच्या कारखान्यात पंचवटीच्या नवीन डब्यांचे काम अंतिम टप्प्यांत आले आहे. महिन्याभरात नवीन डब्यांची ही पंचवटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी चेन्नई येथे रेल्वेच्या कारखान्यात भेट देऊन पंचवटी एक्सप्रेसच्या नवीन डब्यांच्या कामाची पाहणी केली. पंचवटी एक्सप्रेसची आंतर्बाह्य रचना, कार्य हे आदर्शवत असावे, याकरिता विविध सूचना करण्यात आल्या. त्या रेल्वेचे अभियंता एल. सी. त्रिवेदी यांनी मान्य केल्याचे गांधी यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@