नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार: प्रकाश जावडेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ फेब्रुवारीला देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लवकरच १०वी आणि १२ वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा येणार असल्याने नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
‘प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप योजने’ची माहिती प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिली. ‘प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप योजने’च्या माध्यमातून प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी भारतात राहूनच एखाद्या विषयावर शोध करावा तसेच त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग भारताच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला १० कोटी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
 
 
 
 
प्रधानमंत्री रीसर्च फेलोशिप योजनेंतर्गत एक हजार एम.टेक. , बी. टेक विद्यार्थ्यांना ७० ते ८० हजार रुपयांची फेलोशिप प्रती माह दिली जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@