समाजातील सगळ्या स्तरातील नागरिकांना उज्ज्वला योजनेचा लाभ : धर्मेंद्र प्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |
 
 
 

 
 
 
नवी दिल्ली: समाजातील सगळ्या स्तरातील नागरिकांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
 
 
 
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पूर्वोत्तर राज्यातील सगळ्या नागरिकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे, तसेच जे नागरिक बेटावर राहतात त्यांना देखील या योजनेचा फायदा दिला जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बेटावर आणि चहाची शेती करणाऱ्या आणि डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांना देखील या योजनेत समाविष्ट करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
गरिबांच्या घरात उर्जा पोहोचविण्याचे महत्वाचे काम ही योजना करणार आहे. एलईडी आणि एलपीजी ‘उज्ज्वला योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सौभाग्य योजने’च्या माध्यमातून दिले जाणार आहेत. मागास वर्ग आणि अति मागासवर्गीय जातींतील नागरिकांना देखील यात समाविष्ट करण्यात आले आहे. एकही नागरिक या योजनेतून सुटणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
 
या व्यतिरिक्त जे नागरिक या योजनेतून सुटतील त्यांच्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि या माध्यमातून त्यांचा देखील समावेश यात करून घेतला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@