मनपाच्या अंदाजपत्रकात होणार ५० कोटींची वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |

पाणीपट्टीत यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर वाढ

 
 
 
 
नाशिक : मनपाचे चालू आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात ५० कोटींची वाढ होणार आहे. यामुळे महापालिकेच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. मालमत्ता करासह पाणीपट्टीत यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अंदाजपत्रकात वाढ झाली आहे.
 
चालू आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. यामुळे २०१८-१९ या नवीन आर्थिक वर्षाचे नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचे कामलेखा व वित्त कार्यालयाकडून सुरू असून, चालू वर्षाचे सुधारित अंदाजपत्रकाचेही काम मनपाने हाती घेतले आहे.
 
आयुक्तांनी १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात ३८० कोटींची वाढ स्थायी समितीने केली होती. यामुळे हेच अंदाजपत्रक १७९० कोटींपर्यंत गेले आणि महासभेने त्यात आणखी सुमारे ३०० कोटींची वाढ केल्याने अंदाजपत्रक २१०० कोटींपर्यंत गेले, परंतु हे फुगलेले अंदाजपत्रक १५०० कोटींचाही टप्पा पार करू शकलेले नाही. याउलट आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सादर केलेले १४१० कोटींच्या अंदाजपत्रकात मात्र ५० कोटींची भर पडली आहे तर दुसरीकडे स्थायी समिती आणि महासभेने विविध उपाययोजना आणि महसुलात वाढ होण्याचे अनेक मार्ग सांगूनही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही की स्थायी आणि महासभेने त्याबाबत कधी विचारणाही केली नाही. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमध्ये यावेळी विविध कर विभागाकडून चांगली वसुली झाली आहे. या वसुलीच्या जोरावरच मनपाच्या उत्पन्नात वाढ झाल्याने मनपा आयुक्तांचे अंदाजपत्रकातही भर पडली आहे. नवीन अंदाजपत्रकही जवळपास १६०० कोटींच्या पुढचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@