नदीत कचरा टाकणाऱ्यांचा होणार 'सत्कार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |

अकोला जिल्हाधिकाऱ्यांची गांधीगिरी



अकोला : मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत असलेल्या अकोला जिल्हा प्रशासनाने नदीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता गांधीगिरीचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे मोर्णा नदीमध्ये कोणत्याही नागरिकांनी कचरा अथवा निर्माल्य टाकल्यास त्यांना पकडून त्यांच्या जिल्हाधिकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शिक्षा म्हणून कचरा टाकणारी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना नदीमधील कचरा काढण्याचे काम देण्यात येणार आहे, असे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नदीत कचरा टाकणाऱ्यांनो सावधान..! अशी सूचना संपूर्ण शहरामध्ये फिरत आहे.

‎स्वच्छ मोर्णा मोहीमेमुळे मोर्णा आता झपाट्याने स्वच्छ होत आहे, परंतु काही खोडसाळ लोकं अजूनही मोर्णामध्ये निर्माल्य, कचरा आणून टाकत आहेत. अकोलेकरांसाठी ही बाब अशोभनीय असून यापुढे आता कोणी मोर्णा अस्वच्छ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही. कचरा किंवा निर्माल्य टाकणाऱ्यास रंगेहात पकडण्यात येणार आहे. त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी त्या व्यक्तीचा सत्कार करतील. तसेच शिक्षा म्हणून ती व्यक्ती आणि तिच्या कुंटुबीयांकडून दिवसभर मोर्णाची स्वछता करून घेतली जाईल, त्यामुळे कचरा टाकणाऱ्यानो सावधान..! आपली मोर्णा घाण करू नका..!, असा इशारा मोर्णा स्वच्छ मिशनद्वारे देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@