प्रमोशनसाठी नव्हे तर समाजातील घुसमट जाणून घेण्यासाठी फिरतो : नाना पाटेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : सध्या ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेते नाना पाटेकर सर्वत्र फिरत आहेत. नाशिकमध्ये देखील ते आज आले होते. यावेळी ’’आपण प्रसिद्ध असताना प्रमोशन का करता?,’’ असे पत्रकारांनी विचारले असता ’’समाजात आज विविध समस्या आहेत. तरुणांच्या मनातील घुसमट वाढत आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी मी फिरतो,’’ असे पाटेकर यांनी सांगितले.
 
’’चित्रपट चांगला असेल तर चालेल, चांगला नसेल तर चालणार नाही, पण या निमित्ताने आपल्याशी बोलायला मिळते याचा आनंद आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि वितरक निखील सानेदेखील उपस्थित होते. अजय देवगणनिर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला मानूस’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
 
नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका हे या कौटुंबिक, रहस्यमय थरार (सस्पेन्स थ्रिलर) चित्रपटाचे खास वैशिष्ट्य आहे. सुमित राघवन, इरावती हर्षे यांच्याही व्यक्तिरेखा चित्रपटात महत्त्वाच्या आहेत. विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ नाटकावर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती ‘वायकॉम १८’ यांची आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सतीश राजवाडे, ‘वायकॉम १८’ चे निखिल साने आणि नाना पाटेकर यांनी ‘आपला मानूस’च्या बाबतीत पडद्यामागे काय घडले, हा चित्रपट कसा आकाराला आला याचे किस्से ऐकवतानाच मराठी चित्रपटांच्या संहितांपासून ते प्रसिद्धीपर्यंतच्या समस्या, मराठी चित्रपट दिग्दर्शकांची तयारी अशा अनेक विषयांवर या सगळ्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या..
 
@@AUTHORINFO_V1@@