आजच्या सामन्यात विराटचे दमदार शतक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज पुन्हा एकदा शतक ठोकले आहे. १६० धावा करत विराटने या सामन्यात उत्तम धावसंख्या करत दक्षिण आफ्रिकेपुढे मोठे लक्ष ठेवले आहे.
 
 
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात आजचे विराट कोहलीचे हे दुसरे शतक असून एकूण ३४ वे हे शतक त्याने या आधी झळकाविले आहे. १६० धावा करत विराट कोहली याने आज देखील दाखवून दिले की, मीच या मैदानाचा बादशाह आहे. शतक ठोकत आज विराटने दक्षिण आफ्रिकेचा चांगलाच धुव्वा उडविला.
 
 
 
सध्या दक्षिण आफ्रिका मैदानावर खेळत आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे ३०४ धावांचे लक्ष ठेवले आहे. आता हेच लक्ष भेदण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानावर उतरला आहे. मात्र भारताने हाशीम अमलाला पहिल्याच शतकांत बाद करत दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला आहे. आता आजचा सामना कोण जिंकत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@