सुषमा स्वराज यांनी एडेल जुबेइर यांची घेतली भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |
yan
 
 
 
 
 
रियाद : केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज रियादमध्ये सौदी अरेबियातील महत्वाच्या नेत्यांशी भेट घेतली आहे. काल सुषमा स्वराज या सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथील विमानतळावरून रवाना झाल्या होत्या. सुषमा स्वराज यांचा हा पहिलाच सौदी अरेबियाचा दौरा आहे. आज स्वराज  यांनी  सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री एडेल जुबेइर यांची भेट घेतली.
 
  
 
यावेळी सुषमा स्वराज यांचे हिंदी भाषेत स्वागत करण्यात आले तसेच ‘आम्ही भारत गणराज्याचे स्वागत करतो’ या शब्दांच्या फलकाने सुषमा स्वराज यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. स्वराज यांनी यावेळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री एडेल जुबेइर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापार, गुंतवणूक वाढ, उर्जा, संरक्षण, सुरक्षा, संस्कृती आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचा संवाद वाढवणे अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.
 
 
 
 
 
सौदी अरेबिया देशाचा व्यापार संपूर्ण जगात चालतो त्यामुळे भारतात देखील सौदी अरेबियाने गुंतवणूक करावी आणि भारताचा आणि सौदी अरेबियाचा व्यापार वाढवा या उद्देशाने सुषमा स्वराज यांचा हा दौरा असणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@