भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |




केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला न्यू-लॅंड, केपटाऊन येथे सुरूवात झाली आहे. आज दुपारी साडेचार वाजता हा सामना सुरू झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघ फलंदाजी करत आहे. ६ सामन्यांच्या या मालिकेतील २ सामने भारताने जिंकले असून २-० अश्या गुणांनी भारत आघाडीवर आहे.


सध्या भारत १० षटकात १ गडी बाद ५२ धावांवर खेळत आहे. भारतीय फलंदाज रोहित शर्मा हा बाद झाला असून विराट कोहली आणि शिखर धवन हे सध्या खेळत आहेत.
 
 
आजच्या सामन्यासाठीचा भारतीय संघ खालील प्रमाणे - 
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोणी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल 
 
 
@@AUTHORINFO_V1@@