मुंबईमधील अग्नीसत्र सुरुच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |

गोरेगाव येथे पुन्हा एकदा गोडाऊनला भीषण आग





मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून मुंबईमध्ये सुरु असलेला आगींचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही, गेल्या आठवड्यामध्ये गोरेगाव येथे एका कंपनीच्या गोडाऊनला लागलेल्या आगीनंतर आज पुन्हा एकदा गोरेगावमधील आणखीन एका गोडाऊन भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलच्या परिसरात हे गोडाऊन असून आगीनेसध्या भीषण रूप धारण केले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास गोडाऊनमध्ये असलेल्या काही वस्तूंनी पेट घेतला व त्यानंतर हळूहळू ही आग आसपासच्या परिसरात वेगाने पसरली. काही वेळानंतर गोडाऊनमध्ये धूर बाहेर येत असल्याचे माहिती आतील कामगारांनी पाहणी केली असताना गोडाऊनमध्ये आग पसरत असल्याचे पहिले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला देखील मोठी कष्ट करावे लागत आहेत. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान आगीमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. तसेच अजूनपर्यंत कसल्याही प्रकारच्या जीवितहानीचे देखील वृत्त समोर आलेले नाही.

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात देखील गोरेगावमधील कामा इंडस्ट्रियल इस्टेटच्या गोडाऊनला अशा प्रकारची भीषण आग लागली होती. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. या घटनेमध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेले नव्हती परंतु कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे यामध्ये नुकसान झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@