नाशिक मनपाच्या रोजगार मेळाव्यात ५१३ जागांसाठी उमेदवारांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : नाशिक महानगरपालिका, नाशिक व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
या रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे उद्घाटन महापौर रंजना भानसी व आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, विधी समिती सभापती शीतल माळोदे, पूर्व विभाग सभापती शाहीन मिर्झा, नगरसेवक जगदीश पाटील,मुकेश शहाणे, रुची कुंभारकर, नगरसेविका स्वाती भामरे, हिमगौरी आडके, प्रियांका घाटे, भाग्यश्री ढोमस, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर,आर. आर. गोसावी, सुनील सैदाने, उपसंचालक संपत चाटे, सहायक संचालक, नाशिक उपस्थित होते.
 
या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बॉम्बे इंटेलिजन्स सिक्युरिटी इंडिया लि. नाशिक (एस.एस.सी. सिक्युरिटी गार्ड- १०० पदे), धुमाळ इंडस्ट्रीज, सातपूर (ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रॅज्युएट-४ पदे, ऑपरेटर आयटीआय इलेक्ट्रिशियन ८ पदे), आर्ट रबर इंडस्ट्रिज लि.अंबड नाशिक (ट्रेनी -१५ पदे), जनरल मिल्स, माळेगाव-सिन्नर (ट्रेनी एच.एस.सी.- ४० पदे, ट्रेनी इलेक्ट्रिकल- १६ पदे, ट्रेनी फिटर-२५ पदे, ट्रेनी डिप्लोमा इंजिनियर-१० पदे, एस.एस.सी ट्रेनी -१० पदे, एकूण- १०१ पदे), ईपीसी इंडस्ट्रीज लि. अंबड नाशिक (एस.एस.सी ट्रेनी -२५ पदे), तापारीया टुल्स् लि. सातपूर नाशिक (ऑन जॉब ट्रेनी -५० पदे, ट्रेनी अंडर निम ५० पदे, जनरल ट्रेनी २० पदे, टर्नर १० पदे, फिटर १० पदे, ग्राईंडर १० पदे एकूण-१५० पदे), व्हीआयपी इंडस्ट्रीज लि. सातपूर नाशिक (ट्रेनी इलेक्ट्रिशियन-१० ट्रेनी फिटर-१० एकूण-२० पदे), विरगो बिपीवो सर्व्हिस प्रा. लि. अंबड नाशिक (ट्रेनी बिपीवो २० पदे), इन्डोलाईन इंडस्ट्रीज प्रा लि.अंबड नाशिक (कारपेंटर- १०, पेंटर-१५, एकूण -२५ पदे), जहागीरदार फूड प्रा लि.सातपूर नाशिक (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह १० आणि वर्कर १० पदे एकूण -२० पदे), कॅप्रिहन्स इंडिया लि. एमआयडीसी अंबड (अप्रेंटिस-१५ पदे), सह्याद्री हॉस्पिटल वडाळारोड नाशिक (स्टाफ नर्स/क्लिनिक असिस्टंट-५, स्टाफ नर्स डिप्लोमा नर्सिग/बीएससी नर्सिंग-२५, क्लिनिकल असिस्टंट ग्रॅज्युएट मेडिकल-१०, फार्मासिस्ट-५ बी फार्म/ डी फार्म, एकूण-४५ पदे), फ्लायव्हिल रिंग गेयर प्रा. लि. एमआयडीसी सिन्नर (ट्रेनी मॅकेनिकल इंजिनिअर-१, ट्रेनी फिटर-२, ट्रेनी इलेक्ट्रिशियन -२, एकूण -५ पदे), डेल्टा मॅग्नेट, लि. अंबड (ट्रेनी इलेक्ट्रिशियन-६, ट्रेनी फिटर-४, एकूण-१०), किर्लोस्कर ऑईल लि. एमआयडीसी. अंबड नाशिक (अप्रेंटिस मशिन ग्राईंडर-१० पदे), एचसीजी मानवता ऑन्कॉलोजी कस्टमर केअर नाशिक (कस्टमर केअर -१०, स्टाफ नर्स-२०, मार्केटिंग-५, क्लिनिकल असिस्टंट-५, एकूण-४० पदे), झेनिथ मेटाप्लास्ट प्रा. लि. सातपूर नाशिक (डिझायनर डिप्लोमा ऑटोकॅड -५ पदे), पॅटको प्रेसिजन कम्पोनंट प्रा.लि. (क्वालिटी ईन्शुरन्स - बीएससी गणित/भौतिकशास्त्र-४ पदे, ट्रेनी-१० पदे), डाटा मॅक्ट्रिक्स ग्लोबल मुंबई नाका नाशिक (ग्रॅज्युएट / डिप्लोमा-२५, पोस्ट ग्रॅज्युएट-२०, पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट-२०, एकूण-६५ पदे), डिजी डेटा सोल्युशन उंटवाडी नाशिक (ट्रेनी-२५), रिलायन्स निपॉन लाईफ इन्शुरन्स कं.लि.नाशिक (महिला लाईफ प्लॅनिंग ऑफिसर-२०) अशी एकूण ८५२ रिक्तपदे प्राप्त झाली आहेत.
 
याचप्रमाणे, स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मेळाव्यात मुलाखतीसाठी विविध २६ कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात २३३२ उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या ५१३ रिक्त जागांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@