स्त्रीवादी निर्णय आणि एफ-वन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |
 

 
 
 
जगभरात सध्या स्त्रीवादी भूमिका घेण्याचे वारे वाहत आहेत. मग ते सौदी अरबने महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार देणे असेल किंवा अन्य उदाहरणे. महिलांना समाजात पुरुषांबरोबरचे स्थान देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतातही यासारखे प्रयत्न होत आहेत. आता याचे वारे खेळाच्या मैदानातही दिसून येत आहेत. जगभरातील सर्किट ट्रॅकवर लाखो लिटर जेट इंधन जाळणार्‍या ’एफ-वन’ रेसिंग अर्थात ’फॉर्म्युला-वन’ ने देखील ‘ग्रीड गर्ल्स’बाबत निर्णय घेत गेल्या अनेक वर्षांची प्रथा बंद केली आहे.
 
 
’’ही प्रथा अगदीच अयोग्य आहे. आपण सध्या ज्या पुढारलेल्या समाजात वावरतो आहे, त्याला तर अशी प्रथा अमान्यच आहे. महिला या ‘ग्रीड गर्ल्स’ म्हणून नव्हे, तर मैदानात व पदक प्रदान मंचावर खेळाडू म्हणून चमकायला हव्यात,’’ नुकतेच काढलेल्या आपल्या विशेष पत्रकात ‘फॉर्म्युला वन’कडून असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या ‘एफ-वन’ मोसमात बक्षीस समारंभादरम्यान शोभेच्या बाहुल्यांप्रमाणे खेळाडूंच्या शेजारी दिसणार्‍या महिला ज्यांना ‘ग्रीड गर्ल्स’ म्हटले जाते, त्या दिसणार नाही.
 
शर्यत जिंकणारा ड्रायव्हर जेतेपदाची ट्रॉफी स्वीकारताना, प्रथा म्हणून मिळणारी शॅम्पेन मंचावरच उभ्या असलेल्या महिलांच्या अंगावर उडवतो. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर याबाबत टीका होतच होती. या टीकेची दखल घेत ’एफ-वन’कडून असे पत्रक काढण्यात आले. ‘एफ-वन’ हा निर्णय घेते हे खरेच कौतुकास्पद आहे. पण, आपल्या भारतातदेखील खेळाच्या मैदानात मुलींचा वापर होतो. ‘’ हे याचेच उदाहरण. चिअर गर्ल्सचा वापरही थांबवायला हवा. प्रत्येक खेळात वेगवेगळ्या नावांनी अशा महिलांचा वापर करण्यात येतो. प्रोफेशनल बॉक्सिंग, सायकल शर्यती, मार्शल आर्ट अशा खेळात या मुलींचा वापर करण्याआयपीएलची प्रथा आहे. याबाबत आता सोशल मीडियावर टीका होत आहे तर महिलांकडून काम करण्याचा अधिकार काढण्यात येत आहे, असाही मतप्रवाह तयार होत आहे. ‘एफ-वन’ला नजरेसमोर ठेवत जर आयपीएलचा विचार केला तर प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट गेल्यावर चिअरगर्ल्सला करावे लागणारे नृत्यदेखील बंद करण्याचा निर्णय घ्यायला हवा. ‘एफ-वन’ मध्ये आता ‘ग्रीड गर्ल्स’ची जागा ‘ग्रीड किड्‌स’ घेणार आहेत. नवा सिझन दि. २५ मार्च रोजी सुरू होणार आहे. त्यात हे बदल ‘एफ-वन’ प्रेमींना पाहावे लागतील.
 
 
- तन्मय टिल्लू
 
@@AUTHORINFO_V1@@