चिंतामणदादा वनगा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |
 
 
 
खरं तर साम्यवाद्यांना आपल्या विरोधकांची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कुठेही त्यांना संपविणे अशक्य नव्हते. पण, दादांजवळ एक मोठा दैवी गुण होता. तो म्हणजे कार्यावरची निष्ठा, पूर्ण निःस्वार्थ जीवन आणि अखंड कार्यमग्नता. यामुळे विरोधकही त्यांना हात लावू शकले नाहीत. गेले ४० वर्षं ते अखंड काम करत होते. या कामाचे स्वरूप सामान्यातील सामान्य व्यक्तीप्रमाणे शहरातील समस्यांचा विचार ते करत होते. त्याचबरोबर जात, धर्म या कोणत्याही गोष्टीची अडचण त्यांच्या सेवाकार्यात आली नाही. हेच त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जनतारूपी सागराने दाखवून दिले.
 
खरे म्हटले तर दादांनी ’चिंतामणदादा’ या शब्दाला विशेष अर्थ प्राप्त करून दिला. केंद्रातील हजारो माजी परिसरातील शाळांमधील अनेकांचे, हजारोंचे ते ‘चिंतामणदादा’ होते. शिक्षण घेत असताना त्यांना शेतीची खूप आवड होती. पण, काळाची गरज म्हणून त्यांचे मार्गदर्शक माधवराव काणे यांनी त्यांना वकील होण्यास सांगितले. दादा खूप हुशार. त्यामुळे पहिल्याच फटक्यात ते वकील झाले. जव्हारमध्ये त्यांनी वकिली सुरू केली, पण हा व्यवसाय कुटुंबाकरिता नव्हता, तर सामाजिक सेवेसाठी होता आणि त्या माध्यमातून जव्हार परिसरातील अनेक गोरगरिबांची कामे त्यांनी केली. अनेक वेळा आलेल्या अशिलाकडे पैसे नसल्यास प्रवासासाठी ते स्वतःच्या खिशातून पैसे देत. पक्षाच्या प्रचाराच्या कामाला त्यांनी खरं तर सायकलवरून सुरुवात केली. धर्मादादा गोवारी यांच्याबरोबर ते सायकलवरून तलासरी तालुक्यात काम करत. पुढे त्यांच्याकडे ’जाबा’ गाडी आली. मोटारसायकलवरून जव्हार ते तलासरी असा प्रवास अनेक वर्षे सुरू होता. आपल्या मार्गदर्शकांना भेटण्यासाठी कवाडहून जव्हारला जाताना किंवा जव्हारहून कवाडला येताना ते केंद्रात माधवरावांना रिपोर्टिंग करत. त्यांना शेतीची जी आवड होती, ती त्यांनी आयुष्यभर जपली.
 
घरी असताना ते बर्‍याच वेळेस शेतात असत. खासदार झाल्यानंतर दिल्लीहून एक वार्ताहर त्यांची मुलाखत घेण्याकरिता आले होते. तेव्हा त्यांच्या पत्नी शेजारीच शेतावर काम करीत असल्याचे मी वार्ताहराच्या निदर्शनास आणून दिले. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वनगानांही आपली पत्नी शेतात काम करते, याबाबत विशेष काही वाटले नाही आणि स्वतः वहिनींनाही त्याचं विशेष काही वाटत नसे. आज त्यांनी आपल्या घराशेजारी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांची पत्नी-मुले शेतीत राबत आहेत. खरे म्हटले तर तीन वर्षे खासदार, आमदार असूनही त्यांनी आपल्या तीन मुलगे आणि मुलींसाठी कोणताही स्वफायदा करून घेतला नाही. आपल्या मार्गदर्शनामुळे तलासरी परिसरातील हजारो वनवासी शेती करू लागले, याचा त्यांना मोठा अभिमान होता. जव्हार येथील वनवासी गाव हा त्याचा एक नमुना आहे. खोल दरीत असलेल्या गावाला त्यांनी फंडातून रस्ता दिला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीची उलाढाल होऊ लागली. दहा-बारा एकरात केळीची लागवड असलेले आता किमान १५-२० शेतकरी त्या गावात आहेत. त्यांचे वडील हे साम्यवादी, परंतु यांचा कल मात्र देशाच्या सकारात्मक समाजकारणात होता. त्यांचे वडीलबंधू वैदू (भगत) असल्याने त्यांनाही खूप मोठी वनौषधींची माहिती होती. त्यामुळे दादांनाही त्यासंबंधी माहिती होती. त्यात वाघोटी अत्यंत मौल्यवान वनस्पतीची ते माहिती सांगत. त्यानंतर त्यांनी सुरुवातीचा प्रवास सायकल, जीप अशा विविध गाड्यांनी केला.
 
खरं तर साम्यवाद्यांना आपल्या विरोधकांची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कुठेही त्यांना संपविणे अशक्य नव्हते. पण, दादांजवळ एक मोठा दैवी गुण होता. तो म्हणजे कार्यावरची निष्ठा, पूर्ण निःस्वार्थ जीवन आणि अखंड कार्यमग्नता. यामुळे विरोधकही त्यांना हात लावू शकले नाहीत. गेले ४० वर्षं ते अखंड काम करत होते. या कामाचे स्वरूप सामान्यातील सामान्य व्यक्तीप्रमाणे शहरातील समस्यांचा विचार ते करत होते. त्याचबरोबर जात, धर्म या कोणत्याही गोष्टीची अडचण त्यांच्या सेवाकार्यात आली नाही. हेच त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जनतारूपी सागराने दाखवून दिले. नगरहवेली, गुजरात, नाशिक, जव्हार मोखाडा, कल्याण, डोंबिवली आणि पालघर या परिसरातील हजारो मंडळी अंत्यदर्शनासाठी आली होती. हायवेवरील हॉटेल्स उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली होती. २१ जानेवारी रोजी केंद्रातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन झाले. त्यात ते प्रमुख मार्गदर्शक होते. महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढे यायला हवे, असा त्यांनी विषय मांडला. त्या भागात चालू असलेल्या सकारात्मक कार्यात माधवरावांच्या मृत्यूने जो एक धक्का लागला होता आणि तेवढाच धक्का आज यांच्या जाण्याने मला लागला. एक मोठी पोकळी निश्चितपणे या परिसरात निर्माण झाली आहे.
 
त्यांनी संसार केला, परंतु त्यांनी जे चिंतन केले ते सामाजिक स्वरूपाचे होते. कामाच्या अनेक प्रश्र्नांविषयी त्यांचा खूप अभ्यास होता. धरणे, नद्या, रेल्वेमार्ग यातून वनवासी भागाचा विकास व्हावा, अशी त्यांची दृष्टी होती. हजारो कार्यकर्ते वनवासी भागांत आजही कार्यरत आहेत. काही राजकीय क्षेत्रांत गेलेल्या कार्यकर्त्यांची मानसिकता आज बदलली असली तरी केंद्रातील काही जणांची चांगली वृत्ती आजही कायम आहे आणि याच जोरावर दादांनी केलेले कार्य पुढे सुरू राहील, अशी मानसिकता आहे
 
- आप्पा जोशी 
(शब्दांकन : तन्मय टिल्लू)
 
@@AUTHORINFO_V1@@