लासलगावी आठवडे बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : लासलगावच्या आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. लासलगावचा आठवडे बाजार हा दर रविवारी भरतो. या आठवडे बाजारामध्ये चोरीच्या हेतूने अनेक चोर बाजारात शिरकाव करून मोबाईल चोरत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
 
दर रविवारी दहा ते बारा मोबाईल चोरीला जात आहेत. आठवडे बाजार आणि लासलगांव पोलीस कार्यालय हे एकाच ठिकाणी असूनदेखील मोबाईल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारामध्ये मोबाईल चोरीचा धडाका सुरू असून अद्याप एकाही मोबाईल चोराला पकडण्यामध्ये तसेच चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश आलेले नाही.
 
गेल्या तीन महिन्यांत आठवड़े बाजारातून ५० हून अधिक ऍन्ड्रॉईड फोन चोरीला गेले असून त्यांची किंमत तब्बल पाच लाखांहूनही अधिक आहे. परंतु, तरीदेखील चोर्‍याच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलिसांना अपयश आले आहे.
 
लासलगावच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे चोर महागड्या मोबाईलधारकांना टार्गेट करत आहेत. दरम्यान, दर आठवड्याला मोबाईलचोरांची संख्या वाढतच चालली असली तरी नजीकच्या पोलीस ठाण्यात अशा तक्रारींच्या नोंदी मात्र त्या तुलनेने कमी आहे. पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार द्यायला गेले असता त्या तक्रारदारालाच संबंधित पोलीस कर्मचारी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यासारखे प्रश्नांचा भडिमार करतात. त्यामुळे तक्रारीसुद्धा कमी दाखल होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@