ठाण्यात उभारणार ट्रक पार्किंग बे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018
Total Views |

ठाणे मनपाच्या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी

 
 
मुंबई : मोठ्या वाहनांचे पार्किंग हे नेहमीच वादाचा विषय ठरले आहे. त्यावर तोडगा काढण्यात आला असून ठाण्यात ट्रक पार्किंग बे उभारण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेने बाळकुम परिसरात पार्किंग बे उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. नव्याने उभारण्यात येणा-या या पार्किंग बे मध्ये ६०० पेक्षा अधिक अवजड वाहने उभी करता येणार आहेत.
 
ट्रक पार्किंग बे हा प्रकल्प बाळकुम परिसरातील साडेसहा एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे. जास्त रहदारीच्या वेळी ट्रक किंवा अवजड या पार्किंग बे च्या दिशेने वळवण्यात येणार आहेत. या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मनाई असणार आहे. बाळकुमपाडा या ठिकाणी असलेली ही जागा यापूर्वी एमएसआरटीसीच्या बसच्या कार्यशाळेसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत ट्रक बे साठी सदर जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर नगरविकास खात्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
 
 
सध्या अवजड वाहने ही रस्त्याचा बाजूला उभी करण्यात येत आहेत. आता त्यांना पार्कींगसाठी योग्य जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतुककोंडी सुटण्यास नक्कीच मदत मिळेल असे मत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सदर भूखंडाच्या संपादनानंतर एका वर्षाच्या आत या ट्रक पार्किंग बे चे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@