‘साखर उतार्‍यावर भाव देण्याचे धोरण शासनाने राबवावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : ’’साखर कारखानदारी टिकवायची असेल तर साखर उतार्‍यावर भाव देण्याचे धोरण शासनाने राबवावे तरच शेतकरी टिकेल व कारखाने बंद राहणार नाही,’’ असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
 
निफाड तालुक्यातील काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज व महामंलेश्वर महंत गणेशानंद महाराज यांच्या हस्ते झाला. रासाकाचे संस्थापक बाळासाहेब वाघ, माजी आ. दिलीपराव बनकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समिती सभापती पंडित आहेर, तहसीलदार अवळकंटे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, राजाराम पानगव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
हरिभाऊ बागडे म्हणाले की, ’’जसे शासनातर्फे दुधाचा दर ठरविला जातो तसे ऊस उत्पादकाबाबत धोरण राबवले जात आहे, ऊस उत्पादक व कामगारांना शासनाचे माध्यमातून न्याय मिळाला आहे. संस्थेचा विकास साधायचा असेल तर तेथे कामगारांनी जबाबदारीने काम केले पाहिजे.’’ प्रास्ताविक गोपाल आरगडे यांनी केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@