डीआरडीओकडून अग्नी-१ ची यशस्वी चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018
Total Views |


बालासोरा : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ या भारतीय संशोधन संस्थाने देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या अग्नी-१ या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी केली आहे. विशेष म्हणजे हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून शत्रूंच्या गुप्तठिकाणांवर अचूक मारा करण्याची क्षमता यामध्ये आहे. त्यामुळे अग्नी-१ च्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या संरक्षण विभागामध्ये आणखीन भार पडली आहे.

ओडीसातील बालासोरा येथे असलेल्या ए.पी.जे.अब्दुल कलाम या छोट्याशा बेटावर या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. भारतीय लष्करासाठी जमीनवरून जमीनवर मारा करण्याच्या दृष्टीने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या लष्करी शक्तीमध्ये आणखीन भर पडली असून लष्करीदृष्ट्या भारत आणखीन सक्षम झाला आहे, अशी प्रतिक्रिया डीआरडीओकडून देण्यात आली आहे.


भारताच्या 'अग्नी' या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीतील अग्नी-१ हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र (बॅलेस्टीक मिसाईल) आहे. या क्षेपणास्त्राची एकूण लांबी १५ मी. एवढी असून याची वाहकक्षमता ही १ टन इतकी असल्याची माहिती डीआरडीओकडून देण्यात आली आहे. तसेच हे एक मध्यम टप्प्याचे क्षेपणास्त्र असून ओडीसा येथे  ७०० कि.मी.च्या टप्प्यामध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली असल्याचेही डीआरडीओने सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@