गांधीजींच्या चष्म्याच्या प्रतिकृतीची ‘गोल्डन बुक’मध्ये नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018
Total Views |
 


नाशिक : नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी ७ बाय ९ फूट अशा भव्य महात्मा गांधींच्या चष्म्याची प्रतिकृती गांधी जयंतीच्या दिवशी बनवली होती. या प्रतिकृतीची ’गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नुकतीच नोंद करण्यात आली आहे.
 
यासंदर्भातील प्रमाणपत्र ’गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे हेड कम्युनिकेशन युनिट’ चे अन्जेलिया रॉस यांनी नाशिक शहर काँग्रेसचे सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर यांना दिले आहे. महात्मा गांधी यांची जयंती नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडून साजरी करण्यात आली होती. याच दिवशी वसंत ठाकूर यांनी ही प्रतिकृती बनवली होती. ही प्रतिकृती बघण्यासाठी हजारो नाशिककरांनी काँग्रेसच्या कार्यालयात गर्दी केली होती
 
@@AUTHORINFO_V1@@