‘एमबीए सीईटी व उपलब्ध संधी’ या विषयावर कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे नुकतेच एमबीए सीईटीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून एमबीएसाठी फक्त तीनच प्रवेश परीक्षा (कॅट, सी-मॅट व डीटीई सीईटी) घेतल्या जाणार आहेत.
 
त्यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या व अद्याप सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना दि. १० व ११ मार्चला होणारी डीटीई एमबीए सीईटी देणे अनिवार्य ठरणार आहे. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट यासंदर्भात जागृती निर्माण व्हावी या दृष्टीने प्रवेशप्रक्रिया व एमबीएनंतर उपलब्ध संधींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटतर्फे प्रवेश प्रक्रिया व एमबीएनंतर उपलब्ध संधींविषयीच्या कार्यशाळेमध्ये संचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी सांगितले की, ’’फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी आहे. एमबीएसाठी मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.’’ या कार्यशाळेत विभागप्रमुख प्रा. नितीन चौधरी यांनी व्यवस्थापन शाखेतील मार्केटिंग, ऑपरेशन्स इ. विषयांवर मार्गदर्शन केले. नंतरच्या सत्रात प्रा. संजय साळवे यांनी ह्यूमन रिसोर्स व त्यातील व्यवस्थापनाच्या संधी, सद्यस्थितीतील रोजगार व मनुष्यबळ मागणी यावर प्रकाश टाकला.
 
इतर सत्रांमध्ये प्रा. अनुया देशपांडे यांनी वित्त व्यवस्थापन व त्यातील ट्रेंडस तसेच संधींची जाणीव करून दिली. तर प्रा. शीतल गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील विविध शाखांमधील रोजगार संधींवर मार्गदर्शन केले. अंतिम सत्रामध्ये प्रा. स्वाती लाखलगावकर यांनी संपूर्ण एमबीए प्रवेशप्रक्रिया समजावून सांगितली.
 
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व महाविद्यालयास भेट द्यावी, असे आवाहन डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नारायण दीक्षित व प्रभारी संचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी केले. ही कार्यशाळा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट, भोंसला प्रांगण, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येधे आयोजित केली होती. एमबीए प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नितीन चौधरी ९४२१५१३६९२, स्वाती लाखलगावकर ९९२३१५१३३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
@@AUTHORINFO_V1@@