दोन सुज्ञ व्यक्ती लग्नास तयार तर इतरांनी हस्तक्षेप करू नये: सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतींना सुनावले
 
 
 
नवी दिल्ली: जर दोन सज्ञान व्यक्ती लग्न करण्यास तयार असतील तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने, कुटुंब अथवा समाजाने पडू नये असा स्पष्ट निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. खाप पंचायतींना आज सर्वोच्च न्यायालयाने यामाध्यमातून चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तसेच नैतिकतेचे स्वयंघोषित रक्षक बनू नका असा सल्ला देखील सर्वोच्च न्यायालयाने जनतेला दिला आहे.
 
 
 
 
जर सुज्ञ मुलगा आणि मुलगी लग्न करण्यास तयार असतील तर त्यांना लग्न करण्यास अथवा न करण्याचा हक्क द्यायला हवा त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू नका तसेच ‘ऑनर किलिंग’ सारख्या घटना होण्यास प्रवृत्त करू नका असे न्यायालयाने यावेळी सांगितले आहे. आंतरजातीय विवाहाला सुरक्षा पुरवण्यात येईल. जाती, गोत्र याच्याशी न्यायालयाचा संबंध नाही. जर काही बेकायदेशीर कृत्य होत असेल तर त्यावर न्यायालयाच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल.
 
 
 
 
मात्र, दोन सुज्ञ व्यक्ती लग्नास तयार असतील तर त्यावर लोकांनी कायदा हातात न घेता. त्यात हस्तक्षेप करू नये असे न्यायालयाने सांगितले आहे. आज या विषयावर न्यायालयाने वरील सुनावणी केली आहे. आता यापुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या पुढील सुनावणीत प्रेमी जोडप्यांची सुरक्षितता या विषयावर पुढील सुनावणी करण्यात येणार आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@