‘कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी माध्यमे पोलिसांना पूरक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : ’’पोलीस दल समाजात कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कार्यरत आहे तर माध्यमे समाजातील चांगल्या वाईट घटना घडामोडींवर प्रकाश टाकतात. या दोन्ही घटकांचे कार्य सामाजिक शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहे. पोलीस व माध्यमांची साखळी ही एकमेकांच्या कर्तव्यासाठी नितांत आवश्यक आहे. या दोन्ही घटकांचा परस्पर समन्वय हा लोकशाहीत नितांत आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ माध्यमकर्मी राम खुर्दळ यांनी नाशिक येथे केले.
 
नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी यासाठी आयोजित गरूडझेप कार्यशाळेत बदलत्या काळातील माध्यमे व पोलीस या विषयावर ते बोलत होते. पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ असलेल्या ’मंथन’ वाचनालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
 
खुर्दळ पुढे म्हणाले की,’’आजच्या काळात माध्यमे व पोलिसांचे व्याप वाढले आहेत. कामाच्या व्यापात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.’’ अखेरीस कवी इंद्रजित भालेराव यांनी ’माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’ ही कविता सादर केली. यावेळी गरुडझेप परिवाराचे प्रमुख डॉ. संदीप भानोसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@