आमच्या उपासनापद्धती भिन्न, पण जीवनदृष्टी एकसमान : विनय सहस्रबुद्धे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2018
Total Views |

 

मुंबई : आमच्या उपासनापद्धती भलेही भिन्न असतील परंतु मानवी जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन एकसमान आहे असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले. मुंबईतील भाईंदर जवळ उत्तन येथे असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत जगभरातील प्राचीन संस्कृतींच्या प्रतिनिधींच्या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या समारोपाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. चार दिवस सुरु असलेल्या या परिषदेत जगभरातून २७ देशांमधून आलेले १८७ पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत व ते ६० हून अधिक उपासनापद्धतींचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय संस्कृती अभ्यास केंद्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
१ ते ४ फेब्रुवारी दरम्यान उत्तन येथील केशवसृष्टी परिसरात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी विविध संस्कृतीचे लोक आपापल्या पारंपरिक पूजा-उपासना सादर करत होते. दोन हजार वर्षांपेक्षा प्राचीन असलेल्या अशा या सर्व संस्कृती असल्यामुळे एकमेकांच्या उपासनापद्धती पाहणे उपस्थित सर्वांसाठीच माहितीपूर्ण व मनोरंजक ठरत होते. विविध संस्कृतीच्या साहित्य, संगीत, कला व नृत्य यांचे सादरीकरणही या चार दिवसांत करण्यात आले. तसेच विविध देशांतून आलेल्या मान्यवरांनी आपले विचार विविध सत्रांमधून उपस्थित प्रतिनिधींसमोर मांडले. या परिषदेला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे देखील उपस्थित होते. ही परिषद दर तीन वर्षांनी आयोजित केली जाते. परिषदेचे हे सहावे वर्ष असून मुंबईत यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@