भारत वि. दक्षिण आफ्रिका : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताची सरशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2018
Total Views |

दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखत भारताचा दणदणीत विजय


 
 
सेंच्युरियन (द. आफ्रिका) : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दक्षिण आफ्रिकेतील सेच्युरियन येथे सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आजच्या दुसऱ्या सामन्यात आक्रमक गोलंदाजीच्या बळावर भारताने ९ गडी राखत यजमान दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच ६ एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत भारताने २ – ० अशी आघाडी घेतली आहे.
 
 
आज स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी ८ वाजता सामना सुरु झाला. सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलदांजांच्या माऱ्यासमोर यजमान संघाचा अजिबात निभाव न लागल्याने दक्षिण आफ्रिकेच्या ३२ षटके व २ चेंडूत सर्वबाद केवळ ११८ धावा झाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या खाया झोंडो व जीन पॉल ड्युमिनी यांनी सर्वाधिक प्रत्येकी २५ धावा केल्या. तर हशीम आमला याने २३ व क्विंटन डी कॉकने २० धावा केल्या. भारताच्या युझवेंद्र चहलने सर्वाधिक ५ बळी घेतले. तर कुलदीप यादवने ३ बळी घेतले. ८ षटके व २ चेंडूत केवळ २२ धावा देऊन ५ बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
 
 
प्रत्त्युत्तरादाखल भारतीय संघ मैदानात उतरला तोच मुळी ११९ धावांचे तोकडे आव्हान घेऊन. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यंनी उत्तम सुरुवात केली. मात्र चौथ्या षटकात रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने शिखर धवनच्या साथीने हे आव्हान लीलया पेलले व एकविसाव्या षटकातच ११९ धावा करत विजय मिळवला. शिखर धवन याने सर्वाधिक ५१ धावा करत आपल्या खात्यावर अर्धशतक नोंदवले.
 
@@AUTHORINFO_V1@@