संविधानाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2018
Total Views |

 
 
 
उमरेड (नागपूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले व त्या संविधानाने सामान्य माणसाला जगण्याचा आधिकार दिला. त्यामुळे उमरेड नगरपापरिषदेने येथे बाबासाहेबांच्या नावाने समाज भवन उभारले याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन व पं. दीनदयाळ उपाध्याय बहुउद्देशीय सभागृह व शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच विकासात आर्थिक सहयोग देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला, तर उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आभार मानण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही ऐतिहासिक निर्णयांची माहिती दिली. उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, ५० कोटी नागरिकांना सर्वात मोठी आरोग्यसेवा योजना यांची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने अंतिम पात्र शेतकऱ्याला सामावून घेण्यासाठी ऐतिहासिक कर्जमाफीची योजना सुरूच ठेवली आहे, याचीही माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले आणि त्यामुळेच आपण समता, बंधुता आणि स्वातंत्र्य याची अनुभूती घेत आहोत. भारतातील नागरिकाला जगण्याचा प्रत्येक अधिकार त्यातून प्राप्त झाला.
 
 
 
पं. दीनदयालजींनी एकात्म मानवतेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसासाठी विकासाचे दरवाजे खुले केले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामांसाठी उमरेड नगर परिषदेला 15 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी केली आणि स्वच्छ भारत अभियानात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. या भागात वीजनिर्मिती प्रकल्पासाठीही निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. उमरेड तालुक्यातील ११,८३६ शेतकऱ्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ६५ कोटी रुपयांची कर्जमाफी प्राप्त झाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@