अंडर १९ क्रिकेट विश्वचषक: भारताने पुन्हा रचला इतिहास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
न्युझीलंड : येथे आज झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आज भारताने नवा इतिहास रचत १९ वर्षांखालील विश्वचषक भारताच्या नावावर केला आहे. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारताने चौथ्यांदा ही कामगिरी केली आहे.
 
 
 
 
या सामन्यात मनोज कालरा याने उत्तम खेळ करत १०१ धावा करीत त्याचे शतक पूर्ण केले. भारताने हा सामना ३८.५ शतकांमध्येच पूर्ण करत इतिहास रचला आहे. भारताने हा सामना आठ गडी राखत जिंकला आहे. आतापर्यंत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची ही सगळ्यात चांगली कामगिरी मानली जात आहे. आज संपूर्ण भारत आनंदात असून भारतीय संघाला शुभेच्छा देत आहे.
 
 
 
एकंदर २१७ धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने भारतापुढे प्रथम ठेवले होते. त्यानंतर भारतीय संघ मैदानावर आला मात्र २३ धावांवरच पावसाने गोंधळ घालत सामना थांबविला. मात्र काही काळातच पुन्हा सामना सुरु झाला आणि भारतीय संघाच्या खेळाडूंनी जोरदार खेळण्यास सुरुवात केली. आजच्या सामन्यात मनोज कालरा याने उत्तम खेळी करत हा विश्वचषक भारताच्या नावावर करून दिला.
 
 
 
 
भारतीय संघाने उत्तम कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने संघातील प्रत्येक खेळाडूला ३० लाख रुपये, संघाच्या सहायक सदस्यांना २० लाख रुपये तर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ५० लाखांचे बक्षिस घोषित केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@