अंडर १९ विश्वचषक: ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ठेवले २१७ धावांचे लक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
न्युझीलंड : येथे सुरु असलेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला आज सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतापुढे २१७ धावांचे लक्ष ठेवले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात २१६ धावा केल्या आहेत.
 
 
 
 
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे सगळे खेळाडू बाद केले असून आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. मात्र सध्या पावसामुळे हा खेळ थांबवला गेला आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाने या खेळामध्ये व्यत्यय आणला आहे. आज या विश्वचषकाचा अंतिम सामना असल्याने सगळ्यांच्याच नजर आजच्या खेळाकडे लागल्या आहेत.
 
 
 
 
भारत सध्या २३ धावा शून्य बाद अशा स्थितीत खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष भारत पूर्ण करू शकते काय? यावर्षीचा विश्वचषक कोण जिंकेल? असे अनेक प्रश्न सध्या भारतीयांच्या मनात घोळत आहेत. पाऊस थांबल्यावर हा सामना पुन्हा सुरु होईल.
 
 
 
या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय अंडर १९ क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला १०० धावांनी मागे टाकत पहिला सामना जिंकला होता त्यामुळे आज काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
 
 
 
यंदाच्या अंडर-१९ विश्वचषकामध्ये भारतीय संघाने अत्यंत उत्तम कामगिरी केली असून या स्पर्धेत आतापर्यंत झालेले सर्व सामने भारताने जिंकले आहेत. पृथ्वी शॉ याने कर्णधार पदाला साजेशी अशी खेळी या सामन्यांमध्ये केली आहे. 
@@AUTHORINFO_V1@@