विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्वरचित काव्य’ वाचन स्पर्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्वरचित काव्य’ वाचन स्पर्धा
जळगाव, २७ फेब्रुवारी
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या.
 
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या.
यानिमित्ताने विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा इयत्ता ३ री ते ४ थी, इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते ९ वी या तीन गटात झाली.
 
चौथीतील सोनल लढे हिने ‘घड्याळ दादा’ या कवितेतून आपल्या आयुष्यातील वेळेचे व घड्याळाचे महत्त्व स्पष्ट केले. रागिनी पाटील हिने आई-बाबांची गाणी, दीपश्री चव्हाण हिने ‘पावसामध्ये भिजूया’ या कवितेतून पावसात भिजल्यावर मिळणारा आनंद स्पष्ट केला. मिहीर कुलकर्णी हिने ‘वसंताचे स्वागत’, मानसी आसोदेकर हिने ‘निसर्ग माझा गुरु’, योगनंदिनी माळी हिने ‘महाराष्ट्र’ या कवितेतून महाराष्ट्राची ऐतिहासिक थोरवी वर्णन केली, कृतिका कुलकर्णी हिने ‘माझी मातृभाषा’ या कवितेतून मराठी भाषेची स्तुती केली. जय ढाके याने ‘माझी शाळा’ या कवितेतून शाळेने दिलेल्या ज्ञानाबद्दल आभार मानले. दिविज जोशी याने ‘जीवन’ या कवितेतून जीवन आनंदाने जगावे असा संदेश दिला. मानसी आठवले हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेचे गुणगान आपल्या छत्रपती या कवितेतून केले. सिद्धेश पाटील याने ‘शाळा’, गजानन कुलकर्णी याने ‘मैत्री’, गौरी कुलकर्णी हिने ‘मराठी भाषा’, विशाल माळी, आदित्य कुलकर्णी, दिव्या सपकाळे, कासम तडवी व अपर्णा वाढे यांनी ‘आई’ या विषयावर कविता करून प्रेक्षकांना भावूक केले.
 
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयक गणेश लोखंडे, परीक्षा विभाग प्रमुख निलश्री सहजे व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका रत्नमाला पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. सूत्रसंचालन अनुराधा धायबर, प्रास्ताविक संध्या देशमुख यांनी केले. परीक्षक संतोष चौधरी व हर्षदा उपासनी होते.
@@AUTHORINFO_V1@@