शानभाग विद्यालयात मराठी दिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
शानभाग विद्यालयात मराठी दिन
जळगाव, २७ फेब्रुवारी ः
मराठी राजभाषा दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय आणि विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता ५वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली.
 
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, जगदीश चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे शिक्षक मिलिंद नवले आणि दुपार विभागात भूषण गुरव यांनी मराठी भाषेची महती सांगणारे गीत सदर केले. प्रास्ताविक दीपिका चौधरी तर दुपार विभागात प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता चव्हाण व दुपार विभागात रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
 
मराठी कथाकथन स्पर्धेत सकाळ सत्रात २३ तर दुपार सत्रात ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक शिक्षिका अनुराधा देशमुख, सुरेखा शिवरामे तर कथाकथन स्पर्धेचे परीक्षक शिक्षिका प्रियंका पाटील व कविता कुरकुरे होते.
 
दुपार सत्रात झालेल्या काव्यवाचन स्पर्धेत माझा महाराष्ट्र, अपंग आम्हा म्हणू नका, आयुष्याला द्यावे उत्तर, साथ आईची, मैत्री, कणा, माझी मराठी या शांता शेळके, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांच्या कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या. यशस्वीतेसाठी दीपिका चौधरी, प्रविण पाटील व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
 
@@AUTHORINFO_V1@@