रेल्वे स्टेशन परिसरातील हॉकर्सचे स्थलांतर गुंडाळले?विविध विभागांचा एकमेकांशी समन्वय नसल्याने विषय पडला मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
रेल्वे स्टेशन परिसरातील हॉकर्सचे स्थलांतर गुंडाळले?
विविध विभागांचा एकमेकांशी समन्वय नसल्याने विषय पडला मागे
जळगाव, २७ फेब्रुवारी ः
अतिक्रमण विभागाकडून शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील सुमारे १८ ते २० हॉकर्सचे जळगाव जनता बँकेच्या मागील गल्लीत स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या स्थलांतर प्रक्रियेची नुसतीच चर्चा रंगवली जात आहे. अतिक्रमण विभागाचा इतर विभागांशी समन्वय नसल्याने वेळोवेळी ठरवलेला मुहूर्त चुकत आहे. त्यामुळे हॉकर्सचे स्थलांतर गुंडाळले की काय? अशी चर्चा आहे.
 
 
रेल्वे स्टेशन परिसरातील हॉकर्सचे स्थलांतर जळगाव जनता बँकेच्या मागील गल्लीत करण्याचे नियोजन अतिक्रमण विभागाने केले आहे. त्यादृष्टीने अतिक्रमण विभागाने अपर आयुक्तांचे मार्गदर्शन घेऊन संबंधित जागेचा नकाशा करणे, हॉकर्ससाठी नव्या जागेत आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची यादी तयार करणे, स्थलांतरापूर्वी संबंधित जागा विकसित करणे आदी कामे प्राधान्याने केली. ३१ जानेवारीपर्यंत हॉकर्सचे स्थलांतर करण्याचे गृहीत धरून ही कामे तेव्हा करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर अतिक्रमण विभागाला बांधकाम व विद्युत विभागाचे सहकार्य न मिळाल्याने आधीच्या मेहनतीवर पाणी फिरले.
 
 
पत्र देऊनही कार्यवाही नाही
जळगाव जनता बँकेच्या मागच्या गल्लीत हॉकर्सचे स्थलांतर करण्यात येणार असल्याने त्या जागेची मोजणी करून हॉकर्ससाठी पिवळे पट्टे मारणे, उघड्या गटारींवर नव्याने ढापे टाकणे, हॉकर्ससाठी ठिकठिकाणी नळांचे कनेक्शन देणे, प्रकाशासाठी विद्युत व्यवस्था करणे अशी कामे करणे गरजेचे आहे. म्हणून अतिक्रमण विभागाने बांधकाम व विद्युत विभागाला पत्र दिले होते. परंतु, या दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांनी विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे अजूनही ही कामे झालेली नाहीत.
 
 
कार्यवाहीत अडसर
नियोजित जागेवर असलेल्या गटारींची उंची वाढवावी लागणार आहे. त्यानंतर गटारींवर ढापे ठेवता येणार आहेत. स्टेशन रोड परिसरात जागोजागी विद्युत पोल असल्याने प्रकाश व्यवस्थाही लगेचच करता येणार आहे. परंतु, बांधकाम व विद्युत पुरवठा विभाग अतिक्रमण विभागाला सहकार्य करत नसल्याने स्थलांतराच्या कार्यवाहीत अडसर येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@