आम्ही दोन केले, तुम्ही पाकचे चार तुकडे करा! निवृत्त लष्करी अधिकार्‍याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
आम्ही दोन केले, तुम्ही पाकचे चार तुकडे करा!
 
निवृत्त लष्करी अधिकार्‍याचे आवाहन
जळगाव, २७ फेब्रुवारी
 
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानला आणखी एकदा जोरदार दणका देण्याची वेळ आली आहे. भारताने वारंवार इशारे देऊनही त्याकडे लक्ष न देणार्‍या पाकिस्तानचे आधीच्या पिढीने दोन तुकडे केले आहेतच. नव्या पिढीने आणखी चार करावेत, असे आवाहन मेजर जनरल (निवृत्त) डॉ. जी. डी. बक्षी यांनी केले.
 
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे ‘भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढील नवीन आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले. यावेळी बीजभाषण करताना डॉ. बक्षी बोलत होते. ते म्हणाले की, पाकिस्तानमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तरी त्याचा संबंध पाकशी असतो. पाकिस्तानी फौजांना भारतात शांतता नांदावी, असे बिलकूल वाटत नाही. म्हणूनच त्यांनी नवाज शरीफ यांना पदावरून हटविले. अनेकदा इशारे देऊनही हा देश ऐकत नसल्याने त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. या देशाचे आधीच्या पिढीने पाक व बांगलादेश असे दोन तुकडे केले. नव्या पिढीने आणखी चार करावेत, असे आवाहन डॉ. बक्षी यांनी केले. चीनला जसात तसे उत्तर देण्यासाठी जपान, व्हिएटनाम, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया यांची मदत भारताने घ्यावी. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हीच चाणक्यनीती असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
चीनशी पाण्यावरून होईल युध्द
डॉ. बक्षी म्हणाले की, आशियातील प्रमुख १० पैकी ९ नद्या तिबेटमधून वाहत येतात. भविष्यात या नद्यांच्या पाण्यावरून चीन व भारतामध्ये युध्द होऊ शकते. युध्द झाल्यास पहिल्यांदा चीनकडून सायबर हल्ला भारतावर होईल. त्यानंतर मुख्य युध्द लढले जाईल.
 
 
डोकलाम पुन्हा घडू शकते
चीनने गेल्यावेळी अनुकूल स्थितीअभावी डोकलामचा वाद वाढविला नाही. त्यांच्याकडे मतभेद होते. मात्र, उन्हाळ्यात पुन्हा डोकलाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. युध्दाचा प्रसंग आलाच तर भारताने स्वतःची ताकद कमी समजू नये. नौदल आणि वायूसेना यांना मोकळीक द्यावी. चीनमध्ये सर्वकाही सुरळीत नाही. शी जिनपिंग यांना जिवे मारण्याचे पाच प्रयत्न झाले आहेत. चिनी लष्कर गेली ४८ वर्षे युध्द लढलेले नसल्याचे डॉ. बक्षी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रांचा तुलनात्मक आढावा सादर केला.
 
 
 
चाणक्यनीतीची गरज
भारतात २००० वर्षापूर्वी मौर्य कालखंडात अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या प्रश्नाविषयी आर्य चाणक्य यांनी ठोस नितीचा अवलंब केला होता. हीच चाणक्यनिती आज अवलंबविणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बक्षी यांनी व्यक्त केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@