शिवसंकल्प रक्तदाता अभियानात भरले ७० हजार पत्र! भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
शिवसंकल्प रक्तदाता अभियानात भरले ७० हजार पत्र!
 
 
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, २७ फेब्रुवारी
भारतीय जनता पार्टी, वैद्यकीय आघाडी, जळगाव महानगरतर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी ते शिवजयंतीदरम्यान ‘शिवसंकल्प रक्तदाता अभियान’ राबविण्यात आले होते. या अभियान अंतर्गत शहरातील १ लाख तरुणांकडून रक्तदानासाठीचे शिवसंकल्प पत्र भरून घेण्याच्या निर्धार करण्यात आला होता.
 
 
शिवसंकल्प रक्तदाता अभियानाची सुरुवात ११ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीला होऊन १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती रोजी सांगता करण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानात सुमारे ७० हजार शिवसंकल्प पत्र जमा झाल्याचे आयोजक व वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील शैक्षणिक, सामाजिक संस्था व संघटना तसेच गणेश मंडळे, व्यापारी वर्ग व राष्ट्रहित जोपासणारे कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@