तो व्हिडिओ सरकारचा नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |




‘रिव्हर मार्च’च्या व्हिडीओवर मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील नदी शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करणारी ध्वनिचित्रफीत ही महाराष्ट्र राज्य सरकारने वा सरकारच्या कोणत्याही विभागाने तयार केलेली नसून नदी शुद्धीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘रिव्हर मार्च’ या अशासकीय संस्थेने ती तयार केली आहे. त्याचा शासनाशी कोणताही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.

मुंबईतील नद्या स्वच्छ करण्यासाठी ईशा फाऊंडेशन, रिव्हर मार्च अशा अनेक संघटनांनी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्य प्रारंभ केले आहे. अशा अनेक संघटनांनी आपल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे मांडल्या होत्या. या सर्व संघटनांची एक बैठक सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि त्यात नदी शुद्धीकरणासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या अभियानाला आणखी गती देण्यासाठी आणि त्यादृष्टीने जनजागरण व्हावे, यासाठी एक ध्वनीचित्रफीत तयार करण्याचे रिव्हर मार्च या संस्थेने निश्चित केले. हे आवाहन मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने संयुक्तपणे केल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल, अशी विनंती रिव्हर मार्चच्या वतीने विक्रम चौगले यांनी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शवल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच, ही चित्रफित कोणत्या संस्थेमार्फत करायची, याचा निर्णय रिव्हर मार्चनेच घेतला होता कारण, त्याचा खर्च त्यांनीच केलेला होता, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@