महिला शिक्षित आणि सशक्त असेल तरच समाजाचा विकास होईल : रामनाथ कोविंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
चंडीगड : समाजातील महिला शिक्षित असेल आणि सशक्त असेल तरच समाजाचा विकास होईल असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. आज चंडीगड येथे एम सी एम-डी ए वी महिला महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका समारंभात ते बोलत होते. समाजसुधारक दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले हे महाविद्यालय महिलांसाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे असे त्यांनी यावेळी म्हटले.
 
 
 
 
 
नगर नियोजनाच्या बाबतीत चंडीगड हे शहर आपली वेगळी ओळख निर्माण करतं तसेच ‘हरित भारत’, ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्वस्थ भारत’ या सगळ्यांचा पुरस्कार चंडीगड शहर करत असं त्यांनी यावेळी म्हटलं. या शहराने टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर कसा करायचा हे दाखवून दिले आहे. याचे उत्तम उदाहरण ‘नेकचंदचे रॉक बाग’ हे आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
या महाविद्यालयाच्या माध्यमातून महिलांना विविध नवे मार्ग उपलब्ध होत आले आहेत. भारतीय महिला वेगवेगळ्या क्षेत्रात सध्या आपले नाव कमवीत आहेत. त्यामुळे आता महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून महिलांना नवे दालन उपलब्ध होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@