कौमार्य चाचणीची वाच्यता करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |


गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची घोषणा

मुंबई : जातपंचायत नियमांनुसार कौमार्य चाचणी करण्याबाबत जाहीर वाच्यता केल्यास यापुढे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत केली.


शिवसेनेच्या नेत्या आ. डॉ. निलम गोऱ्हे यांनी बुधवारी कौमार्य चाचणी आणि महिलांवरील अत्याचारांना दिल्या जाणाऱ्या समर्थनाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच असे नियम करणाऱ्या जातपंचायतींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सुचना त्यांनी मांडली होती. या सुचनेला रणजित पाटील यांनी उत्तर देताना सदर घोषणा केली. सामाजिक बहिष्कार कायद्याचे उल्लंघन करणा-या घटनांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन पोलिसांकडून स्वत: ‘सु मोटो’ तात्काळ गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी लढा देणाऱ्या सुशिक्षित लोकांबरोबर बैठकगी घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


सदर लक्षवेधी सुचना मांडनाता गोऱ्हे यांनी कंजारभाट समाजात आजही जातपंचायतीच्या नियमांनुसार कौमार्य चाचण्या सुरू असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच देशाच्या संविधानाचा सर्वत्र आदर होत असताना मात्र, कंजारभाट समाजातर्फे आपले वेगळे संविधान निर्माण करून राज्यघटनेचा अनादर करत असल्याच्या गोऱ्हे म्हणाल्या. या समाजातील मुलींना न्याय आणि संरक्षण देण्यासाठी, तसेच असे निर्णय घेणाऱ्या जात पंचायतींवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

@@AUTHORINFO_V1@@