कांचीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |

 
कांची मठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती महाराज यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. मठाने दिलेल्या माहितीनुसार दीर्घ काळापासून आजारी असलेल्या शंकराचार्यांना आज सकाळी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची अंतिम ज्योत मालवली.
 
 
कांची कामकोटी मठाचे ६९ वे जगत्गुरु शंकराचार्य पुज्याश्री जयेंद्र सरस्वती यांना आज सकाळी ९:०० सिद्धी प्राप्त झाली आहे, असे ट्वीट कांची मठाद्वारे करण्यात आले आले, असून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ८२ वर्ष वय असलेले शंकराचार्य गेल्या काही महिन्यांपासून आजारपणाशी झुंज देत होते, असे देखील मठाने स्पष्ट केले.
 
 
 
तामिळनाडूतील तिरुवरुर जिल्ह्यात जन्म झालेले जयेंद्र सरस्वती आपले गुरु चंद्रशेखर सरस्वती यांच्याकडून १९५४ साली वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य हे पद मिळाले होते. त्यांनी हिंदुत्व अध्यात्म यांशिवाय दक्षिण भारतात अनेक सेवा उपक्रम राबविले आहेत. अनेक शाळा, रुग्णालय, बालचिकित्सा प्रकाल्प सुरु करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@