कार्ती चिदंबरम् यांना अटक, केंद्रीय अन्वेषण विभागाची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
चेन्नई : माजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आज केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. चेन्नई येथील विमानतळावरून कार्ती चिदंबरम् यांना अटक करण्यात आली. लाच घेतल्या प्रकरणाच्या चौकशीत कार्ती चिदंबरम् यांनी सीबीआयला सहयोग केले नसल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण सीबीआयने दिले आहे.
 
 
 
 
‘ईडी’कडून २०१७ मध्ये कार्ती चिदंबरम् यांच्याविरुद्ध लाच घेण्याच्या प्रकरणावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. सक्तवसुली संचालयालयाने कार्ती चिदंबरम् यांची १.१६ कोटी रूपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. कार्ती चिदंबरम् यांच्यावर एअरसेल मॅक्सिस घोटाळ्याचा आरोप असल्याने ‘ईडी’ने त्यांची सर्व बँक खाती देखील जप्त केली होती.
 
 
 
 
त्यांच्यावर बऱ्याच महिन्यांपासून कारवाई सुरु होती मात्र या प्रकरणाच्या चौकशीत सीबीआयला त्यांनी सहयोग न केल्याने त्यांना आता अटक करण्यात आली आहे. ब्रिटनमधील अघोषित संपत्तीबाबत आयकर विभागाला माहिती द्यावी अशी नोटीस आयकर विभागाकडून त्यांना बजावण्यात आली होती. तसेच त्यांच्या विरोधात सीबीआयने तपासणी नोटीस देखील जारी केली होता. मात्र कार्ती चिदंबरम् यांनी कसलीही परवा न करता आपले काम सुरु ठेवले होते यामुळे त्यांना आज अटक करण्यात आली. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@