आजपासून राज्यभरात दहावीच्या परीक्षांना सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |

 
 
मुंबई :  आज पासून राज्यभरात दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. दहावीची परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जितकी महत्वाची असते, तितकीच विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, त्यांच्या शिक्षकांसाठी महत्वाची असते, त्यामुळे या परीक्षेला आपसुकच एक अनन्य साधारण महत्व मिळालेलं आहे.
 
 
एक मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. नऊ विभागांत परीक्षांची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संचालिका शंकुतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी राज्यात १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ९ लाख ७३ हजार १३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेत होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सात, असे संपूर्ण राज्यात २५२ भरारी पथके नेमण्यत आली आहेत. "गैरमार्गाशी लढा" याबद्दल मुलांचे प्रबोधनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचविण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली असुन विद्यार्थ्याना वेळेत प्रश्नपत्रिका मिळेल.
 
 
विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव न घेता आत्मविश्वास मनाशी बाळगून परीक्षा द्यावी, असे आवाहन मंडळाच्या संचालिका शंकुतला काळे यांनी केले आहे. या काळात मुलांवर परीक्षेचा तणाव असतो, तसेच चांगले गुण मिळवावे अशा पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा देखील असतात. त्यामुळे या परीक्षेकडे अत्यंत महत्वाच्या दृष्टीने बघितलं जातं. यंदा महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षांमध्ये काय होणार, तसेच मुलांचे भवितव्य काय असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@